इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा : भाग 2



 (इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा ) 



 इतिहासलेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यांतील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया.


रेने देक (१५९६ - १६५०) :


इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या 'डिस्कोर्स ऑन द मेथड' या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. 'एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये' हा तो नियम होय.


रेने देकार्त


व्हॉल्टेअर (१६९४-१७७८) : व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवाविचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे  म्हतर्कशुद्ध 


जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (१७७०-१८३१): या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले


पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. 'एनसायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस' या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले 'रिझन इन हिस्टरी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.


जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल असलेल्या पुराव्यांनुसार


जाणून घ्या.


हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ; खरे-खोटे, चांगले-वाईट. या पद्धतीला 'द्वंद्ववाद' (डायलेक्टिक्स) असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते.


लिओपॉल्ड व्हॉन रांके (१७९५-९८८६) : एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. 'द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी' आणि 'द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी' या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे.


कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर मालकीवर अवलंबून असतात. व समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन


वर्गसंघर्ष निर्माण होतो. कार्ल मार्क्स मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात


उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक


शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली.


‘दास कॅपिटल' हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.


अॅनल्स प्रणाली : विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली. अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.


स्त्रीवादी इतिहासलेखन


स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदूषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशीनिगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाधेन सुरू झाले. १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो.मायकेल फुको (१९२६-१९८४) : विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहासलेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्याच्या 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज'


या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले. पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले.


मायकेल फुको


पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला.


आधुनिक इतिहासलेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपटनिर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले.


Comments