१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
इतिहासलेखनाची परंपरा
1.1 इतिहास लेखनाची परंपरा
१.२ आधुनिक इतिहासलेखन
१.३ युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा
विकास आणि इतिहासलेखन
1.4 महत्त्वाचे विचारवंत
गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते.
वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पदधतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते.
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारणइतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल, त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही, हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात.इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदा., पुरातत्त्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळींचा अभ्यास, इत्यादी.
१.१ इतिहासलेखनाची परंपरा
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.
अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे, इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो, हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात.
जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहासलेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहासलेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो.
उफ्रान्स येथील लुन या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख
वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत.
ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपेटोमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून, तो सध्या फ्रान्समधील लुव्र संग्रहालयात ठेवलेला आहे.)१.२ आधुनिक इतिहासलेखन आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात :) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते
२) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.
(३) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना वि विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे म इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.
(४) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात, असे मानले जाते. 'हिस्टरी' हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इ.स.पू १५ व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या 'द हिस्टरिज्' या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
१.३ युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन
इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाहीअभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप-अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहासलेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले; इतिहासलेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले.
अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन १७३७ मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली.
Next part link is given below:
Comments